राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Election 2024) आचारसंहिता सुरु आहे. या कालावधीत निवडणूक आयोगाने आतापर्यंत ६६० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत ही जप्ती करण्यात आली आहे. (Assets seized) ही रक्कम २०१९ मध्ये जप्त करण्यात आलेल्या संपत्तीच्या तुलनेत तब्बल पाचपट आहे. २०१९ मध्ये पूर्ण निवडणूक काळात १२२ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
(हेही वाचा – Border – Gavaskar Trophy 2024 : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी रवी शास्त्रींनी भारतीय संघाला सुनावले खडे बोल)
काय काय केले जप्त ?
- १५३ कोटी रुपयांची रोख रक्कम
- ६८ कोटी ६३ लाख रुपये किमतीची ६८ लाख ५१ हजार ३६४ लिटर दारू
- ७२ कोटी रुपयांचे १ कोटी १ लाख ४२ हजार ४५२ ग्रॅम अमली पदार्थ
- ८२ कोटी ४९ लाख किमतीचे १ कोटी ६४ लाख ७२ हजार ५९६ ग्रॅम मौल्यवान धातू
- ३ कोटी ७८ लाख रुपयांच्या मोफत वाटपासाठी आणलेल्या ५७ हजार ९४९ वस्तू
- इतर साहित्यामध्ये १३ लाख ७३ हजार ७७५ इतक्या ७५ कोटी ६० लाखांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या.
राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर (cVIGIL Citizen App) एकूण ८ हजार ६७८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८ हजार ६६८ तक्रारी आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. (Maharashtra Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community