धनराज साळवी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) बिगुल वाजले असून, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले ७८ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहेत. मात्र, या उमेदवारांच्या यादीत चांदिवली विधानसभा क्षेत्रामधील एका गुजराती उमेदवाराला निवडणुकीचे तिकीट दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. (Maharashtra Election Assembly 2024)
हा गुजराती चेहरा आहे तरी कोण ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत अल्टिमेट दिल्यानंतर सर्वात आधी खळ्ळखट्याकचा आवाज आला तो चांदिवली विधानसभेतून… मनसे पक्षाची स्थानपा झाल्यापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले, स्वत: गुजराती समाजाचे असूनही माय मराठी भाषेसाठी झगडणारे, “मी गुजराती आहे पण, सर्वात पहिला मान मराठीचाच” असं ठणकावून सांगणारे मनसेचा गुजराती चेहरा म्हणून ओळख असलेले महेंद्र भानुशाली (Mahendra Bhanushali) यांना चांदिवली विधानसभा (Chandivali Assembly) निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आहे.
(हेही वाचा – Maharashtra Election Assembly 2024 : मनसेची पाचवी यादी जाहीर; ‘आमित देशमुख’ ही उमेदवारी यादीत!)
विधानसभेसाठी तिरंगी लढत
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे एकाच टप्प्यात मतदान येत्या २० नोव्हेंबर रोजी होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र, चांदिवली विधानसभा (Chandivali Assembly) क्षेत्रातील उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार असून, शिवसेना पक्षातून दिलीप (मामा) लांडे (Dilip (Mama) Lande), काँग्रेस पक्षातून नसीम खान तर मनसेकडून (MNS) महेंद्र भानुशाली (Mahendra Bhanushali) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community