VVPAT स्लिप आणि EVM च्या मतांमध्ये तफावत नाहीच; निवडणूक आयोगाचा खुलासा

97
VVPAT स्लिप आणि EVM च्या मतांमध्ये तफावत नाहीच; निवडणूक आयोगाचा खुलासा
VVPAT स्लिप आणि EVM च्या मतांमध्ये तफावत नाहीच; निवडणूक आयोगाचा खुलासा

महाराष्ट्र निवडणुक आयोगाने (Maharashtra Election Commission) दि, १० डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील व्हीव्हीपॅट वोटसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. यात आयोगाने व्हीव्हीपॅट वोटमध्ये विसंगती असल्याचा विरोधकांचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच कोणत्याही व्हीव्हीपॅट (VVPAT) स्लीप्समध्ये आणि ईव्हीएमच्या (EVM) नंबरांमध्ये विसंगती आढळलेली नाही, असे आयोगाने सांगितले.

( हेही वाचा : Kurla Best Bus Accident : अपघातग्रस्त बसमधील सीसीटीव्ही ठरणार महत्त्वाचा पुरावा

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, निवडणुक अधिकाऱ्यांनी प्रत्येक विधानसभा क्षेत्रापैकी पाच मतदान केंद्र निवडून व्हीव्हीपॅट (VVPAT) स्लीप्सची मोजणी केली. ज्याला आयोगाने दि. २३ नोव्हेंबर रोजी ईव्हीएममधील मताच्या संख्येशी जोडून पाहिले. त्यानंतर आयोगाने सांगितले की, व्हीव्हीपॅट स्लीप्समध्ये आणि ईव्हीएमच्या (EVM) नंबरांमध्ये विसंगती आढळलेली नाही.

निवडणुक आयोगाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण १४४० व्हीव्हीपॅट मधल्या स्लीप्सची अनिवार्य मोजणी दि. २३ नोव्हेंबरमध्ये पूर्ण करण्यात आली. मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदारसंघामध्ये प्रत्येकी ५ मतदान केंद्रांच्या क्रमांकाची सरमिसळ करून आयोगाच्या निरीक्षकांसमोर आणि उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान केंद्र निवडण्यात आली. मात्र ईव्हीएममधील (EVM) मतांची उमेदवारानिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट (VVPAT)मशीनमधील उमेदवारीनिहाय स्लीप्सची संख्या यामध्ये कुठेही तफावत आढळली नाही. यासंदर्भातील अहवालही ३६ जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले आहेत. आणि ईव्हीएमच्या (EVM) नंबरांमध्ये विसंगती आढळलेली नाही.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.