ओबीसी आरक्षणाशिवाय १०५ जिल्हा परिषदांच्या जागांवर मतदान सुरू

184

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण रद्द केल्यावर तसेच निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावल्यावर मंगळवारी, २१ डिसेंबर रोजी राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये १०५ नगरपंचायतच्या जागांवर निवडणूक होत आहे. त्या जागांवर मतदान सुरु झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडत आहे. मागील काही दिवसांपासून निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला होता. सोमवारी प्रचार संपल्यानंतर मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.

या प्रमुख नगरपंचायतीच्या लढतींकडे लक्ष 

भंडारा जिल्हा परिषदेच्या 39 जागासाठी पंचायत समितीच्या 79 जागा तर नगर पंचायतिच्या 39 जागासाठी तर गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 43 जागा नगर पंचायतीच्या 86 जागा तर पंचायत समितीच्या 45 जागासाठी हे मतदान होत आहे.

(हेही वाचा ई-चलनाची भानगड नको म्हणून लढवली जातेय भन्नाट शक्कल…)

विजय वडेट्टीवार, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला

  • पोंभुर्णा – एकूण जागा -17, या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत असून भाजप 17, काँग्रेस 17, शिवसेना16 आणि राष्ट्रवादी15 जागा लढवत आहे.
  • गोंडपिंपरी – एकूण जागा -17, या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत असून भाजप 17, काँग्रेस17, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 13 जागा लढवत आहे.
  • कोरपना – एकूण जागा – 17, या ठिकाणी काँग्रेसने सर्व 17 जागांवर आपले उमेदवार दिले आहे तर दुसरीकडे भाजप, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना आणि शिवसेना यांची छुपी युती आहे. या सर्व पक्षांनी काँग्रेस विरुध्द मिळून आपले उमेदवार दिले आहे. या ठिकाणी भाजप 10, राष्ट्रवादी 02, शेतकरी संघटना 04 आणि शिवसेना 01 जागा लढवत आहे. भाजप आपल्या कमळ या चिन्हावर लढत आहे तर राष्ट्रवादी, शेतकरी संघटना आणि शिवसेना हे टेबल या चिन्हावर लढत आहे.
  • जिवती – एकूण जागा – 17, या ठिकाणी भाजप आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी यांची युती असून गोगपा 10 आणि भाजप 07 जागा लढवत आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती असून काँग्रेस 09 आणि राष्ट्रवादी 08 जागा लढवत आहे. शिवसेना स्वतंत्र पणे निवडणूक लढत असून 10 जागी त्यांनी उमेदवार दिले आहेत.
  • सिंदेवाही – एकूण जागा – 17, या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत असून भाजप 17, काँग्रेस 17, शिवसेना 6 आणि
  • राष्ट्रवादी 16 जागा लढवत आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला सावली – एकूण जागा – 17, या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत असून भाजप 17, काँग्रेस 17, शिवसेना 8 आणि राष्ट्रवादी 8 जागा लढवत आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.