Assembly Election Results 2024 : राज्यात ३६ पैकी २१ जिल्ह्यात काँग्रेसला भोपळा

43
Assembly Election Results 2024 : राज्यात ३६ पैकी २१ जिल्ह्यात काँग्रेसला भोपळा
Assembly Election Results 2024 : राज्यात ३६ पैकी २१ जिल्ह्यात काँग्रेसला भोपळा

एकेकाळी राज्यात २०० पेक्षा अधिक आमदार असणाऱ्या काँग्रेसला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत फक्त १६ आमदारांवर समाधान मानावे लागले. त्यातही लोकसभेत जास्त खासदार निवडून आलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाला राज्यात २१ जिल्ह्यात एकही आमदार निवडून आणता आला नाही. त्यामुळे ३६ पैकी २१ जिल्ह्यात काँग्रेसची (Congress) पाटी कोरी राहिल्याने काँग्रेस (Congress) बॅकफुटला गेल्याचे स्पष्ट जाणवत आहे. परंतु १९७०, १९८० च्या दशकात काँग्रेसचे राज्य विधानसभेत २०० पेक्षा अधिक आमदार निवडून आले होते. तसेच अनेक जिल्ह्यात काँग्रेसची घट्ट पकड होती. पण त्यानंतर काँग्रेसची ताकद हळूहळू कमी होताना दिसत आहे. (Assembly Election Results 2024 )

( हेही वाचा : Assembly Election 2024: मुख्यमंत्र्यांसोबत २० आमदार शपथ घेण्याची शक्यता

दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan), यशोमती ठाकूर(Yashomati Thakur), विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat ) , नसिम खान यांच्यासह अनेक मातब्बर मंडळींचा पराभव झाला. सहा महिन्यापूर्वी याचं काँग्रेसने लोकसभेत १३ खासदार निवडून आणले होते. त्यामुळे काँग्रेसच्या विधानसभेत अपेक्षा वाढल्या होत्या. पण विधानसभा निकालानंतर काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. पुणे, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला (Congress) नेहमी यश मिळत असे. पण आता अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाने नांदेडमध्ये काँग्रेसला फटका बसला. तर इतर दोन ठिकाणी ही काँग्रेसला आमदार निवडून आणता आला नाही. (Assembly Election Results 2024 )

या जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही

धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वर्धा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, संभाजीनगर, नाशिक,पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, बीड, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. (Assembly Election Results 2024 )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.