महाराष्ट्राने चीन आणि पाकिस्तान एवढचं नव्हे तर ऑस्ट्रेलिया थायलंड या देशांनाही मागे टाकत साखर उत्पादनात पहिला क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राने भारतात साखर उत्पादनात नेहमी अव्वल असणा-या उत्तर प्रदेशलाही मागे टाकत प्रथम स्थान पटकावले आहे.
कोल्हापूरचे विक्रमी उत्पादन
महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून देण्यात एकट्या कोल्हापूरचा मोठा हात आहे. कोल्हापूर विभागाने राज्यात बाजी मारत राज्यातील एकूण उत्पादनाच्या 23 टक्के इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. महाराष्ट्र साखरेच्या बाबतीत 60 वर्षांपासून स्वयंपूर्ण असून सध्या राज्यात 210 साखर कारखाने असून त्यातील 195 कारखान्यांचे गाळप सुरु आहे.
( हेही वाचा: अॅमेझॉनवर होत आहे भारतीय ‘गणराज्याचा’ अपमान )
म्हणून महाराष्ट्र अव्वल स्थानी
गतवर्षी 2020-21 मध्ये कोल्हापूर विभागात 2 कोटी 31 लाख 8 हजार 558 मेट्रिक टन इतके उसाचे गाळप झाले होते. तर 2 कोटी 77 लाख 38 हजार 106 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. उतारासुद्धा 12 टक्के होता. मात्र, यामध्ये मोठी वाढ झाली आहे. 2 कोटी 47 लाख 14 हजार 781 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे. 2 कोटी 90 लाख 82 हजार 154 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. अद्याप निम्मे साखर कारखाने सुरू आहेत. ते गळीत हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने देशातच नव्हे तर इतर महत्वाच्या देशांच्या तुलनेत अव्वल स्थान पटवकावले आहे.