मंत्रिमंडळ विस्तार रविवारी होणार?

एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार स्थापन होऊन १ महिना उलटला, राज्याचा गाडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच हाकत आहेत. त्यामुळे हे सरकार विरोधकांच्या टार्गेटवर आले. अखेर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ७ ऑगस्ट रोजी करण्यात येईल, असे संकेत दिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला 

मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अनेकदा तारीख पे तारीख मिळाल्यानंतर आता अखेर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाल्याचे संकेत मिळत आहेत. शिंदे सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. येत्या रविवारपर्यंत अर्थात ७ ऑगस्टपर्यंत शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे विधान दीपक केसरकर यांनी केले आहे. शिवसेनेतील नाराज शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील शिवसेना यांच्यात न्यायालयीन लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये  मंगळवारी, ३ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांकडून जोरदार वाद-प्रतिवाद झाले. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी गुरुवार, ४ ऑगस्टपर्यंत स्थिगिती केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here