Devendra Fadnavis यांच्याकडून चहावाल्याला शपथविधीचं निमंत्रण

133
Devendra Fadnavis यांच्याकडून चहावाल्याला शपथविधीचं निमंत्रण
Devendra Fadnavis यांच्याकडून चहावाल्याला शपथविधीचं निमंत्रण

राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. मात्र, अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यातच नागपुरातील एका चहाविक्रेत्याला शपथविधीचं आमंत्रण देण्यात आलेले आहे. गोपाळ बावनकुळे या चहाविक्रेत्याला भाजपा (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथविधीचा पास पाठवला आहे. विशेष म्हणजे, या चहाविक्रेत्याने स्टॉलवर देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis)फोटोही लावला आहे.

( हेही वाचा : Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ चुकीचा निर्णय भारताच्या पथ्यावर?

याबद्दल चहाविक्रेते गोपाळ बावनकुळे (Gopal Bawankule) म्हणाले की, दि. ५ डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीसाठी मला पक्षाने आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)पास पाठवला आहे. मी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. चहावाला म्हणून मला निमंत्रण मिळालेलं आहे. आम्ही त्यांना मेसेज करतो किंवा कोणत्याही माध्यमातून त्यांची भेट घेतो तेव्हा ते आम्हाला मदत करतात, असे चहाविक्रेते गोपाळ बावनकुळे म्हणाले.

दरम्यान भाजपाच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची निवड होणे अपेक्षित आहे. या भैटकीनंतर बाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) (Ajit Pawar) महायुतीच्या आमदारांची संयुक्त बैठक पार पडेल. त्यानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेसाठई दावा केला जाईल. राज्यपालांकडून मंत्रिमंडळ शपथविधी समारंभ दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित केला असल्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती (Gopal Bawankule) गोपाळ बावनकुळे यांनी दिली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.