मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर राज्य सरकारकडून राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी विचारविनिमय करण्यात येत होता. त्यानंतर आता राज्य सरकारने राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरक्षेत वाढ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आधीच वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांची ही सुरक्षा राज्य सरकारने कायम ठेवली असून, पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आता एक अतिरिक्त पोलिस अधिकारी आणि अंमलदार राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील.
राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर, बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत होते. राज ठाकरे यांची झेड प्लस सुरक्षा 2020 मध्ये कमी करत ठाकरे सरकारने त्यांना व्हाय प्लस सुरक्षा देऊ केली होती. राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तरी संपूर्ण महाराष्ट्र पेटेल, असे राज ठाकरेंना आलेल्या धमकीनंतर म्हणण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community