-
सुजित महामुलकर
लव्ह जिहाद (Love Jihad) आणि दबावाखाली धर्मांतर करण्याचे वाढते प्रकार रोखण्यासाठी महायुती सरकार कठोर कायदा करण्याचा गांभीर्याने विचार करत असून याबाबत अभ्यास करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली आहे.
समिती स्थापन
राज्याच्या गृह विभागाने पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्य असलेली विशेष समिती गठीत केली असून महिला व बाल विकास विभाग, अल्पसंख्यांक विकास, विधी व न्याय आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव त्याचप्रमाणे गृह विभागाचे दोन सदस्य सचिव हे सदस्य म्हणून काम करतील.
(हेही वाचा – तुमच्या वाहनांना HSRP Number Plate लावल्यात आहेत का? ही आहे शेवटची मुदत)
अनेक तक्रारी
आजी-माजी आमदार खासदार किंवा अन्य लोकप्रतिनिधी, राज्यातील विविध संघटना व काही नागरिकांनी लव्ह जिहाद व फसवणूक करून किंवा बळाचा वापर धर्मांतरणासाठी होत असून असे प्रकार रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत निवेदने सादर केली होती. (Love Jihad)
‘वेलेंटाइन डे’चा दिवस
भारतातील काही राज्यांकडूनही लव्ह जिहाद व फसवणूक करून किंवा बलपूर्वक केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदे तयार करण्यात आले आहेत. याअनुषंगाने महाराष्ट्रातील सद्य स्थितीचा अभ्यास करुन लव्ह जिहाद (Love Jihad) व फसवणूक करून किंवा बलपूर्वक केलेले धर्मांतरण या अनुषंगाने प्राप्त तक्रारीबाबत उपाययोजना सुचवणे, इतर राज्यातील कायद्याचा अभ्यास करणे व कायद्याचा मसुदा तयार करणे तसेच कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष समिती गठीत करण्याबाबत शासन विचार करत होते.
शुक्रवारी १४ फेब्रुवारी २०२५ या दिवशी, म्हणजेच आंतरराष्ट्रीय प्रेमाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवशी ‘लव्ह जिहाद’ समिती गठीत करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community