आफताब या नराधमाने श्रद्धा या हिंदू तरुणीचा खून केला आणि भारत देश खाडकन् जागा झाला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे केल्यानंतरही हा विकृत आपलं आयुष्य सहजपणे जगत होता. त्यानंतर पुन्हा एकदा लव्ह जिहादचा मुद्दा समोर आला. अनेक वर्षांपासून लव्ह जिहाद या विषयावर चर्चा होत आहे. परंतु शासनाकडून ठोस पावले उचलली जात नव्हती. अनेक सामाजिक कार्यकर्ते या विषयावर काम करत होते आणि तरुणींची सुटका करत होते अशी माहिती सोशल मीडियावरुन कळत होती.
( हेही वाचा : राज्यभरात धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा करा, वारकरी महाअधिवेशनात ठराव संमत)
आता शिंदे-फडणवीस सरकार मात्र यावार गंभीरपणे विचार करत आहे. राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्यातल्या अनेक तरुणी लव्ह जिहादमुळे बेपत्ता झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. महिला आयोगाच्या बैठकीत मंगल प्रभात लोढा म्हणाले, “लग्नानंतर ज्या मुलींचा आपल्या मूळ कुटुंबियांशी संपर्क तुटला आहे, त्यांची सध्या काय परिस्थिती आहे. तसेच आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन ते एका व्यक्तीसोबत निघून गेल्या आहे. ज्यामुळे आपल्या कुटुंबियांना ते तक्रारही करत नाही. ज्या व्यक्तीसोबत त्या निघून गेल्या आहेत. त्या व्यक्तीला माहित आहे की, या मुलींना त्यांच्या कुटुंबीयांचं समर्थन नाही. म्हणून त्यांचं काय होत हे आपण श्रद्धा वालकर प्रकरणातून पाहिलं आहे. अशा मुलींना मदत करता यावी म्हणून मी एक विशेष पथक नेमण्याचे निर्देश दिले आहे.”
मंगल प्रभात लोढा यांना हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जाते. ते हिंदुत्वनिष्ठ आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांना हे खातं देऊन लव्ह जिहादच्या बळी ठरलेल्या मुलींना न्याय देण्याचा विडा उचलला आहे. बर्याचदा ढोंगी पुरोगामी लोक लव्ह जिहाद नावाचा प्रकार अस्तित्वात नाही असे म्हणत होते. हिंदू तरुणींना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांना आपल्या धन्याच्या मतदारांची चिंता अधिक होती असे दिसते. त्यामुळेच त्यांनी लव्ह जिहाद हा गंभीर गुन्हा नाकारला आहे.
आता मात्र अशा प्रकरणांना वाचा फोडली आहे आणि मंगल प्रभात लोढा यांना महिलांच्या सन्मानाची आणि सुरक्षिततेची चिंता असल्यामुळे त्यांनी विशेष पथक नेमले आहे. कायदेशीर बाबीत पुष्कळ वेळ लागू शकतो. परंतु एका सरकारने हा दुर्लक्षित मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे, त्यामुळे हिंदू तरुणींना दिलासा मिळाला आहे असेच म्हणावे लागेल. आता मुलींना घाबरायचं कारण नाही. त्यांच्या मागे सरकार उभं राहणार आहे.
Join Our WhatsApp Community