वीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या ‘शिदोरी’ मासिकावर गुन्हा दाखल करणार – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या 'जनमानसाची शिदोरी' या मासिकावर गुन्हा दाखल होणार आहे.

321
वीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या 'शिदोरी' मासिकावर गुन्हा दाखल करणार - देवेंद्र फडणवीस
वीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या 'शिदोरी' मासिकावर गुन्हा दाखल करणार - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘जनमानसाची शिदोरी’ या मासिकावर गुन्हा दाखल होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत त्यासंदर्भात माहिती दिली.
‘जनमानसाची शिदोरी’ या मासिकाच्या फेब्रुवारी २०२० च्या अंकात ‘स्वातंत्र्यवीर नव्हे, माफीवीर’ आणि ‘अंधारातील सावरकर’ असे दोन लेख छापण्यात आले. अत्यंत विकृत मनोवृत्तीने लिहिलेले आणि शंभर टक्के असत्यावर आधारित, वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे हे लेख सावरकरांची मानहानी करणारे आहेत. त्यात ज्या वीक मासिकातील लेखांचा संदर्भ देण्यात आला आहे त्याबाबत न्यायालयात खटला दाखल आहे.
त्यामुळे वीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या ‘शिदोरी’ मासिकवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सावरकर प्रेमींकडून करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने १३ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्रही देण्यात आले. या मासिकावर त्वरित बंदी घालून, लेख लिहिणाऱ्या लेखकांना आणि ते छापणाऱ्या संपादकांना अटक करावी, अशी मागणी त्यातून करण्यात आली. मात्र, ठाकरेंनी काँग्रेसच्या मुखपत्रावर कोणतीही कारवाई केली नाही.

काय म्हणाले फडणवीस?

महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेना-भाजपा युती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही ‘शिदोरी’ मासिकवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिदोरी’वर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती विधानसभेत दिली. फडणवीस म्हणाले, वीर सावरकरांविषयी काँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’मध्ये आक्षेपार्ह लेखन केले जात आहे. त्यामुळे महापुरुषांबाबत अशाप्रकारे लेखन करणाऱ्या ‘शिदोरी’ मासिकवर गुन्हा दाखल केला जाईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.