राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या सुरक्षेबाबत शिंदे-फडणवीस सरकार महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्य मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांची सुरक्षा वाढवण्याचा विचार सरकारकडून करण्यात येत आहे. या मंत्र्यांना वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेसह एस्कॉर्ट कॅटेगरीची सुरक्ष पुरवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता
अलिकडेच सरकारने उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. तर महाविकास आघाडीमधील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली होती. त्यानंतर आता राज्य सरकार मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाची मुख्यमंत्री शिंदे घेतात अधिक काळजी…)
या मंत्र्यांचा समावेश
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत,कामगार मंत्री सुरेश खाडे,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण,सहकार मंत्री अतुल सावे आणि महिला, बालकल्याण मंत्री व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.
अशी असते वाय दर्जाची सुरक्षा
Y दर्जाच्या सुरक्षेत एकूण 11 सुरक्षा रक्षक असतात. यामध्ये दोन ते चार कमांडोंचा देखील समावेश असतो. तसेच या सुरक्षा कर्मचा-यांच्या ताफ्यात दोन ते तीन वाहने असतात.
Join Our WhatsApp Community