राज्यपालांची कोरोनावर मात, रूग्णालयातून डिस्चार्ज; सत्ताबदलाच्या हालचालींना येणार वेग?

89

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २२ जून रोजी बुधवारी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी सव्वा ९ वाजेच्या दरम्यान, त्यांनी गिरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज रविवारी चार दिवसांनंतर राज्यपाल कोश्यारी यांनी कोरोनावर मात केली असून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले होते की, राज्यपालांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली होती. मात्र राज्यपालांचे वय लक्षात घेता कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यपाल कोश्यारींना काही दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे आणि विश्रांतीची गरज आहे असे सांगण्यात आले होते. गेल्या सोमवारपासून राज्यात सुरू झालेल्या राजकीय पेचप्रसंगात एकनाथ शिंदे राज्यपालांची भेट घेणार होते. मात्र राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याने पुढील राजकीय घडामोडींना काहीसा स्वल्पविराम लागला होता. पण आता पुढील काही दिवसांत पुन्हा राजकीय घडामोडींना वेग येईल आणि हा पेच सुटून नियमित राज्यकारभार चालू होईल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

राज्यपाल कोणता निर्णय घेणार

डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज्यपाल राज्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार असून त्यानंतर ते काही निर्णय घेणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यपालांना एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात राज्यातल्या परिस्थितीत हस्तक्षेप करा, अशी मागणी भाजपने केली. तसेच राज्यात नवनवीन जीआर काढले जात आहेत. तत्काळ निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे राज्यपालांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालावे, असे म्हटले होते. त्यामुळे या पत्रावर राज्यपाल काही निर्णय देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोरोनावर मात करत राज्यपाल राजभवनात

बंडखोर आमदारांवर कारवाई होणार?

यासह महाराष्ट्रात शिवसेना बंडखोरांविरोधात आक्रमक झाली असून एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांना गद्दार म्हणत त्यांची कार्यालये फोडण्यात आली आहेत. एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, श्रीकांत शिंदे अशा अनेक बंडखोर नेत्यांचे पुतळे जाळणे, पोस्टरला काळे फासणे, असे प्रकार घडताना दिसताय. तर शिवसेना आता बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे बंडखोर मंत्र्यांच्या मंत्रिपदावरही गदा आणण्याचे शिवसेनेचे प्रयत्न चालू असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.