शिवरायांवरील बेगडी प्रेम दाखवू नका, महाराजांचे नाव घेणे बंद करा! उदयनराजे यांनी मांडल्या भावना

172

राष्ट्रपुरुषांचा अवमान हा राष्ट्रध्वजाच्या अवमानासारखा घेतला पाहिजे. पक्षांचे प्रमुख नेते असे का करतात? शिवरायांच्या अवमानप्रकरणी सगळे जण एकत्र का दिसत नाहीत? असेच करायचे असेल तर महाराजांचे नावच पुसून टाका. बेगडी प्रेम का दाखवता? कशाला शिवजयंती साजरी करता, कशाला शिवप्रताप दिन साजरा करायचा? महाराष्ट्र सरकारने अजून शिवरायांचा अधिकृत इतिहास प्रसिद्ध केला नाही. याप्रकरणी आपण राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे, तरीही कारवाई झाली नाही तर शिवरायांचे नाव घेणे बंद करावे, असेही उदयनराजे म्हणाले.

रायगडावर निषेध करणार

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे वक्तव्य केल्यामुळे राज्यभर त्याचे पडसाद उमटले आहेत. याची उदयनराजे महाराज दखल घेत ३ डिसेंबर रोजी रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीस्थळी जाऊन आपल्या भावना व्यक्त करण्याची घोषणा केली, असेही उदयनराजे म्हणाले.

(हेही वाचा सनातन धर्म सर्वश्रेष्ठ आहे, भाजपच्या नेत्या रुबी आसिफ खान यांचे वक्तव्य)

महाराजांवर राजकारण नको

राज्यात शिवरायांचा अवमान होत असल्याप्रकरणी गुरुवारी, २४ नोव्हेंबर रोजी राज्यातील कानाकोपऱ्यातून सर्व विचारांच्या संघटना एकत्र आल्या, त्यांच्यामध्ये साधक बाधक चर्चा झाली. त्यामध्ये ३ डिसेंबर रोजी शिवरायांच्या अवमानप्रकरणी निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा सर्वच राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर लावली जाते, त्यांचे नाव घेऊन राजकारण केले जाते, त्यांना अभिवादन केले जाते आणि दुसरीकडे शिवरायांचा भाषणे, चित्रपट, पुस्तकांतून अवमान केला जात आहे. वेगवेगळ्या विचारांचे वेगळे वेगळे पक्ष असले, तुमचे अजेंडा वेगळे असले तरी शिवरायांचे नाव घेता तेव्हा तुमचे एकमत असते, जर नसेल तर कशाला शिवरायांचे नाव घेता? सोयीप्रमाणे मांडलेला इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचेला तर काय होईल?, असेही उदयनराजे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.