राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार?

145

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे संकेत मिळल्याचे समजते आहे. परंतु हे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे व तथ्यहीन असल्याचे, राज्यपालांच्या जवळील लोकांकडून सांगण्यात येत आहे. राज्यपाल लवकरच पदमुक्त होणार, असे वृत्त जाणूनबुजून खोडसाळपणे प्रकाशित केले जात असल्याचे समोर आले आहे. राज्यपालांनी तसे कोणतेही संकेत दिले नसल्याचे समजते आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करताना, शिवाजी महाराज हे जुन्या काळातले नायक होते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले होते. सर्व पक्षांकडून या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याशिवाय, छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजी यांनीदेखील राज्यपालांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

( हेही वाचा: राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे; मिमिक्री पाहायची असेल तर जाॅनी लिव्हरची पाहू, राऊतांचा राज ठाकरेंना टोला )

राज्यपालांची वादग्रस्त वक्तव्ये

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आधीदेखील वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यावेळी विविध स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही वक्तव्य केले होते. त्यानंतर मुंबईतील एका चौकाचे उद्घाटन करताना कोश्यारी यांनी गुजराती आणि राजस्थानी समुदायामुळे मुंबईला महत्त्व मिळाले असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राज्यपालांवर चहुबाजूने हल्लाबोल झाला होता. त्यानंतर राज्यपालांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.