राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. तर महाविकास आघाडीची देखील चांगली कामगिरी आहे.
- नंदूरबारमध्ये भाजपने आतापर्यंत 9 तर काॅंग्रेसने 7 आणि ठाकरे गटाने 1 ग्रामपंचायत जिंकली आहे. विजयकुमार गावित हे भाजपमध्ये आले होते. त्यांना भाजपने मंत्रीपद दिल्यानंतर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढताना दिसत आहे.
- 1 हजार 165 ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरु आहे. यापैकी 100 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी भाजपने 23, शिंदे गटाने 14, ठाकरे गटाने 15, काॅंग्रेसने 9 आणि राष्ट्रवादीने 17 तर इतरांनी 22 जागा जिंकल्या आहेत. भिवंडीत मनसेने खाते खोलले आहे.
- नागपुरात काॅंग्रेसने खाते उघडले आहे. नागपुरातील अंभोरा ग्रामपंचायत भाजपने जिंकली आहे. याठिकाणी राजू कुकडे हे सरपंचपदी निवडून आले आहेत. तर नाशिकच्या उंपरपाड्यात विकास आघाडीचा सरपंच झाला आहे.
( हेही वाचा: नंदुरबारमध्ये 9 ग्रामपंचायतींवर भाजपचा विजय; वाचा सविस्तर )
Join Our WhatsApp Community