शिंदे सरकारने आता विश्वास मत जिंकले आहे. १६४ अशा भरभोस मतांनी विजयी होऊन त्यांनी आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मजबूत केलेली आहे. अर्थात याचे शिल्पकार हे देवेंद्र फडणवीस आहेत. तशी प्रामाणिक कबुली एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे.
( हेही वाचा : मोदी-शहांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करुन नेमकं काय साध्य केलं आहे?)
फडणवीस हे सरकारचे खरे कलाकार
कालची विधानसभा एकनाथ शिंदेंनी गाजवली आहे. या निमित्ताने गंभीर दिसणारे एकनाथ शिंदे हे किती दिलखुलास आहेत हे सबंध महाराष्ट्राला कळले आहे. शिंदे बोलत असताना ते मुख्यमंत्री आहेत असं न वाटता आपल्यातलाच कुणीतरी सामान्य माणूस आहे असं वाटत होतं. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडताना मनात कोणत्याही प्रचारचा किंतु-परंतु न ठेवता आणि कोणत्याही प्रकारचे टोमणे न मारता मनमोकळ्या पद्धतीने आपलं गार्हाणं त्यांनी मांडलं.
आपण सदैव शिवसैनिक राहणार असून, सूडाचं राजकारण करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, “पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पण नाकाबंदी कशी टाळायची हे मला माहित आहे.” “ते गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये राहायचे, ते आमदार झोपल्यानंतर फडणवीसांना भेटायला जायचे. मग ते पहाटेच पुन्हा हॉटेलमध्ये पोहोचायचे. देवेंद्र फडणवीस हे सरकारचे खरे कलाकार आहेत” असंही ते म्हणाले.
हिंदुत्वाचं मूळ महाराष्ट्रात कसं घट्ट होईल याकडे विशेष लक्ष
त्यांच्या प्रत्येक वाक्याला सभागृहात हशा पिकत होता. देवेंद्र फडणवीस तर लाजतंही होते. शिंदेंनी यावेळी अनेक गंमती जंमती केल्या. आता ते कामे कशाप्रकारे करणार आहेत हे पुढील काळात आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेल्या एकनाथ शिंदेंच्या रुपात एक नवं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं आहे, यात कोणालाही दुमत असण्याचं कारण नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासह हिंदुत्वाचं मूळ महाराष्ट्रात कसं घट्ट होईल याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे.
Join Our WhatsApp Community