मशिदींमध्ये सीसीटीव्ही का नाहीत? मनसेच्या प्रश्नाला गृहमंत्र्यांनी दिलं उत्तर

160

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यावरुन अनेक वाद-प्रतिवाद सुरू आहेत. राज ठाकरे यांनी 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याचे आवाहन केल्यानंतर त्यावरुन त्यांच्यावर धार्णिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच आता मनसेकडून मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी करण्यात आल्यानंतर त्याला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उत्तर दिलं आहे. सीसीटीव्ही लावणं हा प्रत्येक धार्मिक स्थळांचा ऐच्छिक निर्णय असून त्यात राज्य सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

इच्छेने निर्णय घ्यावा

राज्यातील मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यासंदर्भात कोणीही सूचना दिलेल्या नाहीत. मंदिरात जर कोणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्वच्छेने सीसीटीव्ही लावत असतील तर तो त्यांचा ऐच्छिक प्रश्न आहे. इतर धर्मीयांना त्यांच्या प्रार्थना स्थळांमध्ये सीसीटीव्ही बसवायचे असतील तर त्याला सरकारचा विरोध असणार नाही. आपल्या इच्छेनुसार त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः गृहमंत्री घेणार भोंग्यांवर बैठक, राज ठाकरेंना बोलावणार)

मनसेची मागणी

जवळपास सर्वच मंदिरांत सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. परंतु मशिदींमध्ये सीसीटीव्ही आहेत का? सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांत सीसीटीव्ही यंत्रणा का करू नये? यामुळे अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल, तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचं कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली होती.

(हेही वाचाः ‘दोन दिवसात सगळं सुरळीत होईल…’, परबांनी मागितली जनतेची माफी!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.