संजय राऊतांची भाषा कैद्यांसारखी, जेलमध्ये जाऊन शिकले – चंद्रशेखर बावनकुळे 

125

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली, त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर सडकून टीका केली. संजय राऊत हे तीन महिने जेलमध्ये राहून आले. त्यामुळे ते षंढ, मर्दानगी, रेडे अशा शब्दांची भाषा शिकून आले. कैद्यांची अशा प्रकारची भाषा असते. मात्र महाराष्ट्रातील जनतेला ही भाषा सहन होणार नाही, असे म्हणाले.

काय म्हणाले बावनकुळे? 

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न उफाळून आलेला असताना शिंदे-भाजप सरकारने तोंडाला कुलूप लावले आहे. हे षंढ, नामर्द सरकार आहे. तुमच्यात दम असेल तर केंद्र सरकारला या प्रश्नावर तोडगा काढायला सांगा. मराठी भाषिकांवरील अन्याय आम्ही सहन करणार नाहीत.. परिस्थिती चिघळली तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. कोणतीही अनुचित घटना देशाला किंवा महाराष्ट्राला परवडणारी नाही. मंत्री गेले नाहीत म्हणून सरकार षंढ आहे, धमक नाही, ही भाषा संजय राऊत यांना शोभत नाही. मर्दानगी आणि सरकार चालवण्याची धमक शिंदे आणि फडणवीस यांच्यात कशी आहे, हे संजय राऊत यांना माहिती आहे. प्रत्येक गोष्टीचे उत्तर सामाजिक वातावरण बिघडवून मिळत नाही. मागच्या अडीच वर्षात तुमचे सरकार होतं तर सीमा प्रश्नात त्यांनी काय भूमिका घेतली? जेलमध्ये गेल्यावर ते आतल्या कैद्यासोबत राहून काही गोष्टी शिकून आले. तेथून काही वाक्य मिळतात, ते तेथून घेऊन आलेत. आमदारांना रेडे म्हणतायत, असेही बावनकुळे म्हणाले.

(हेही वाचा सीमावादावर राज ठाकरे कडाडले; म्हणाले, महाराष्ट्रातून कोण खतपाणी घालत आहे, सरकारने पहावे…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.