ठरले! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बोम्मई यांना भेटणार

140

महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात सीमावाद आता खूप मोठ्या प्रमाणात पेटला आहे, दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व घडामोडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी, ६ डिसेंबर रोजी तातडीने मंत्रिमंडळातील मंत्र्यांची वर्षा बंगल्यावर बैठक घेतली, त्यानंतर या बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यात फोनवर चर्चा झाल्याचे सांगितले.

दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये फोनवर चर्चा

बेळगावनजीक कन्नड रक्षण वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड केली. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खेद व्यक्त केला. यावर बोम्मई यांनी सकाळी जो प्रकार झाला त्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. काही लोकांवर आधीच केली आहे, असे सांगितल्याचे सामंत म्हणाले. याचबरोबर दोन्हा राज्यातल्या लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यासंदर्भात दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. दोन्ही राज्यातील जनता सुखाने, समाधानाने राहिली पाहिजे. त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, असे बोम्मईंना सांगण्यात आले. एवढेच नाही तर दोन्ही मुख्यमंत्री लवकरच यासंदर्भात भेटणार असल्याचे सामंत म्हणाले.

(हेही वाचा महिलांना फसवून वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या धर्मांध मुसलमानांना अटक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.