सध्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद दिवसागणिक चिघळत चालला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई हे जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या सीमेवरील गावांवर हक्क सांगत आहेत, त्यामुळे हा वाद आणखी पेटला आहे. अशा परिस्थिती महाराष्ट्रातील सर्व पक्षांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अशा परिस्थितीत आता या वादात सामाजिक संस्थाही पडल्या आहे. सोमवारी, ६ डिसेंबर रोजी कन्नड रक्षण वेदिका या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावजवळील हिरेबागवाडी येथे अक्षरशः धुडगूस घालत महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे आता याचे पडसाद साहजिकच महाराष्ट्रातही उमटण्याची शक्यता आहे.
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांची बेळगावात घुसखोरी
बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे टोलनाक्यावर वातावरण चिघळले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कन्नड रक्षण वेदिकेचे नेते नारायण गौडा मंगळवार, ६ डिसेंबर रोजी बेळगावच्या दौऱ्यावर आले. पोलिसांनी त्यांना बेळगाव दौरा करण्यास मनाई केली होती. तरीही ते बेळगावच्या दिशेने आले. त्यामुळे हिरेबागवाडी येथील टोलनाक्यावर पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी आक्रमक झालेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील पाच-ते सहा वाहनांवर दगडफेक केली.
(हेही वाचा मुसलमान कुटुंबावर धर्मांतर विरोधी कायद्याचा उगारला बडगा, हिंदू तरुणीचे जबरदस्तीने केले धर्मांतर)
Join Our WhatsApp Community