Maharashtra Karnataka Border Dispute : सीमावादप्रकरणी आता कोल्हापुरात होणार एल्गार

95

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद विकोपाला पोहचला आहे. कन्नड रक्षण वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्टाच्या गाड्यांची तोडफोड केल्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष शनिवारी, १० डिसेंबर रोजी रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे सीमा भागात पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यपालांच्या बैठकीतील तपशील समोर यावा 

सीमावादाला हिंसक वळण देणाऱ्या आणि बेताल वक्तव्ये करत सुटलेल्या कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीने कोल्हापुरात एल्गार पुकारला आहे. शनिवारी कोल्हापुरात कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. शनिवारी शाहू महाराजांच्या समाधीजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीराजे यांना देखील निमंत्रित केले जाणार आहे. यासाठी घेतलेल्या बैठकीत आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आदी नेते उपस्थित होते. दोन्ही राज्यांच्या राज्यपालांची या आधी कधीही बैठक झालेली नव्हती. मात्र, काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यपालांची बैठक झाली. या बैठकीत नेमके काय झाले? याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला समजली पाहिजे. या बैठकीत काय घडले हे सामोरे आले पाहिजे, असेच आमदार सतेज पाटील म्हणाले.

(हेही वाचा समान नागरी कायदा म्हणजे स्त्रियांना अनेक पती करण्याचा अधिकार, जावेद अख्तरांनी तोडले अकलेचे तारे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.