कर्नाटकमध्ये मराठी बांधवांवर सुरू असलेल्या अत्याचाराचे सोमवारी विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेने (UBT) या विरोधात आवाज उठवत कारवार, बेळगाव केंद्र शासित करण्याबरोबरच तेथील मराठी बांधवांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहावे, अशी मागणी केली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी घटनेचा निषेध व्यक्त करत, सीमावर्ती भागातील मराठी बांधवांच्या पाठिशी सरकार एकमताने आणि पूर्ण शक्तीने उभे राहिल, अशी ग्वाही विधान परिषदेत दिली. तर विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा तथा सभापती निलम गोऱ्हे यांनी वीर सावरकरांची प्रतिमा पुन्हा लावण्यासाठी कर्नाटकच्या सभापतीना पत्र देण्यात येईल, असे स्पष्ट केले.
(हेही वाचा – Human Rights Day: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे महत्त्व काय आहे?)
महाराष्ट्र एकिकरण समितीला महाअधिवेशन घेण्यासाठी कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली तसेच कार्यकत्यांची धरपकड केली, त्याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत, हा मुद्दा उपस्थित करीत याबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) त्यावर सरकारची भूमिका मांडली. कर्नाटकमधील मराठी बांधवांवरील अत्याचाराचा निषेध केला. राज्यातील बारा कोटी जनता आणि जगभरातील मराठी बांधव एकदिलाने बेळगावातील मराठी बांधवांच्या पाठीशी आहे. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला जो अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचे उल्लंघन कर्नाटकमध्ये सुरू आहे. त्या ठिकाणी मराठी भाषिकांचा मेळावा घेता येणार नाही अशी संकुचित भूमिका घेतली आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट असलेल्या लढ्याविरोधात लढावे लागेल, असे सांगितले. तसेच वीर सावरकर यांची प्रतिमा हटविण्याच्या कृतीचा देखील त्यांनी निषेध केला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी, मुख्यमंत्री पदाच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, मराठी माणसावर अन्याय होऊ नये, अशी भूमिका मांडली होती. तीच भूमिका कायम राहिल, असे स्पष्ट केले. (Maharashtra Karnataka Border Issue)
(हेही वाचा – केंद्राचा पुरेपुर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करा; अधिकाऱ्यांना सूचना देत मुख्यमंत्री Devendra Fadnavis अॅक्शन मोडवर)
सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषद सभागृहाच्या गटनेते पदी निवड केल्याची घोषणा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी केली. विधान परिषदेत शिवसेनेचे (UBT) संख्याबळ अधिक आहे. शिवसेनेवर (UBT) वचक ठेवण्यासाठी शिंदे यांची नियुक्ती केल्याचे बोलले जाते. मात्र, शिंदे यांच्या निवडीमुळे विधान परिषदेत, शिवसेना (UBT) विरोधात शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे. (Maharashtra Karnataka Border Issue)
मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या तशाच
शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी जुन्या मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या अजूनही काढण्यात आलेल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी सांगावं हेच मंत्री परत होणार आहेत. किती वर्ष प्रवीण दरेकरांना तुम्ही विश्वास दर्शक ठराव मांडायला लावणार, त्यांना मंत्री करा अशी कोपरखळी परब यांनी लागली. आणि सभागृहात एकच हशा पिकला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community