‘त्या’ वादग्रस्त फेक ट्विटचा शोध लागला; शिंदे- बोम्मई यांच्यात चर्चा, लवकरच होणार कारवाई

141

महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला असताना, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आपल्या नावे ट्वीट करणा-या व्यक्तीचा शोध लागलेला आहे, अशी माहिती बोम्मई यांनी शिंदे यांना यावेळी दिल्याचे समजते.

विधिमंडळाचे अधिवेशनाबाबत मुख्यमंत्री आपल्या गटाच्या काही खासदारांशी रामगिरी या नागपुरातील शासकीय निवासस्थानी चर्चा करत होते. त्याचवेळी बोम्मई यांचा त्यांना फोन आला. मुख्यमंत्री शिंदे आतील खोलीत गेले आणि त्यांची बोम्मई यांच्याशी सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. कर्नाटकमध्ये मराठी बांधवांवर हल्ले झाले तर त्याचे पडसाद महाराष्टात उमटतील. दोन्ही राज्यांसाठी ही बाब योग्य नाही तेव्हा संयम राखणे आवश्यक आहे, अशी विनंती शिंदे यांनी बोम्मई यांना केली. त्याला बोम्मई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती मिळाली आहे.

( हेही वाचा: ‘ज्या मोर्चाला मूक मोर्चा म्हणून हिणवले, त्याचाच राजकारणासाठी वापर करताय’; राऊतांच्या व्हिडिओवर संभाजीराजे संतापले )

तीन-तीन मंत्र्यांची एक समिती स्थापन होणार 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बोम्मई यांची एकत्रित बैठक दिल्लीत बोलावली होती. त्यावेळी दोन्ही राज्यांच्या तीन-तीन मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्याचे ठरले होते. आपणाकडून तीन मंत्र्यांची नावे लवकर निश्चित करा, आम्ही ती निश्चित करत आहोत, असे बोम्मई यांनी शिंदे यांना सांगितल्याची माहिती आहे.

बोम्मई यांनी सीमा प्रश्न पेटलेलला असताना, एक ट्वीट केले होते, ते वादग्रस्त ठरले. आता हे वादग्रस्त ट्वीट करणा-याचा शोध लागला आहे.

फेक अकाऊंट ऑपरेट करणारा ‘तो’ कोण?

फेक अकाऊंटवरुन ते ट्वीट कोणी केले होते याचा शोध आम्ही घेतला आहे, अशी माहिती बोम्मई यांनी शिंदे यांना रविवारी मोबाईलवरुन चर्चा करताना दिली. तसेच, फेक अकाऊंट ऑपरेट करणारा एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याने मुद्दाम बदनामीच्या हेतून तसे केले, असेही बोम्मई यांनी स्पष्ट केल्याचे समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.