कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू करण्यापूर्वीच रविवारी (१४ जानेवारी) दोन जबरदस्त धक्के बसले आहेत. ही यात्रा महाराष्ट्र आणि आसाममधून होणार आहे, मात्र महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता आसाममधील नेते अपूर्व भट्टाचार्य यांनीही कॉंग्रेसला राम राम ठोकला आहे. त्यामुळे दोन नेत्यांनी राजीनामा दिल्यामुळे यात्रेपूर्वीच राहुल गांधी यांच्या पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
आसाममध्ये कॉंग्रेस पक्षाला सातत्याने धक्के बसत आहे. बडे नेते पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये आसाम कॉंग्रेसच्या दोन प्रमुख नेत्यांनी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. राजीनामा दिलेल्या दोन नेत्यांमध्ये नाजावचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बोरा आणि आसाम प्रदेश युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष पोरीटुष रॉय यांचा समावेश आहे. त्यानंतर आज कॉंग्रेसचे सचिव अपूर्व भट्टाचार्य यांनी राजीनामा दिला आहे.
(हेही वाचा – Congress leader Karan Singh : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहण्यास संकोच नको’ )
मिलिंद देवरा यांची Xवर पोस्ट…
पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर लिहिले आहे की, ‘आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. मी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे कॉंग्रेससोबत ५५ वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. गेल्या अनेक वर्षांत पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा ऋणी आहे.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community