Maharashtra legislative Council ची निवडणूक पुढे ढकलली; नवी तारीख कधी जाहीर होणार?

175

लोकसभा निवडणुक रंगात असतानाच जाहीर करण्यात आलेल्या विधान परिषद निवडणुकीबाबत (Maharashtra legislative Council) महत्वाची माहिती समोर आली आहे. शिक्षक, पदवीधरच्या चार मतदारसंघांसाठी जाहीर केलेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या चार जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार होते, तर १३ जूनला मतमोजणी केली जाणार होती.

मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात ही निवडणूक होणार होती. या चारही मतदारसंघातील आमदारांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे याबाबतचा निवडणूक (Maharashtra legislative Council)  कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, आता या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या शाळांना सुट्टी असल्याने या निवडणुकीवर परिणाम होईल, अशी शंका अनेक शिक्षक संघटनांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने या निवडणुका आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा Ghatkopar Hoarding Accident : करोना काळात ठाकरे सरकारने दिला होता मुंबई होर्डिंग ओनर्स असोसिएशनला हात)

खालील चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपणार होता

  • मुंबई पदवीधर मतदारसंघ – विलास विनायक पोतनीस (ठाकरे गट)
  • कोकण पदवीधर मतदारसंघ निरंजन वसंत डावखरे (भाजप)
  • नाशिक शिक्षक मतदारसंघ किशोर भिकाजी दराडे (ठाकरे गट)
  • मुंबई शिक्षक मतदारसंघ कपिल हरिश्चंद्र पाटील (लोकभारती)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.