Maharashtra Legislative Council : महाराष्ट्र विधान परिषदेत ‘म-भ’ अपशब्द; उपसभापती वक्तव्ये तपासणार

163
Maharashtra Legislative Council : महाराष्ट्र विधान परिषदेत 'म-भ' अपशब्द; उपसभापती वक्तव्ये तपासणार

दिल्लीतील लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या हिंदूंवरील टिप्पणीवर महाराष्ट्रातील विधान परिषदेत पडसाद उमटले. सभागृहात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि उबाठा आमदार अंबादास दानवे यांनी भाजपाच्या आमदारांना उद्देशून भर सभागृहात ‘म’वरून अपशब्द वापरल्याचा आरोप झाला. दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत असल्याचे सांगत दानवे यांची वक्तव्ये तपासली जातील, असे ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले. (Maharashtra Legislative Council)

हिंदूंचा अपमान

राहुल गांधी यांच्या लोकसभेतील हिंदूंबाबत जाहीर वक्तव्य करीत हिंदूंचा अपमान केला. या गोष्टीचा ‘निषेध ठराव’ मांडावा आणि सभागृहाने एकमताने हा ठराव मंजूर करावा अन्यथा सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी आमदारांनी घेतली. तसेच या विषयावर दानवे यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केली. तसेच लाड यांनी दानवे यांना निलंबित करावे, अशी मागणी केली. (Maharashtra Legislative Council)

‘म-भ’चे अपशब्द

दरम्यान, दानवे यांनी उत्तर देत प्रश्न केला की, “जे वक्तव्य ज्याचं असेल त्याचं लोकसभेत झालेलं आहे, त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का?” तसेच “आपल्याकडे हात करून बोलू नको,” असे सभागृहात सांगत दानवे यांनी लाड यांना दम देत ‘म-भ’चे अपशब्द वापरल्याचे सभागृहाने ऐकले. (Maharashtra Legislative Council)

(हेही वाचा – Lok Sabha Session : अनुराग ठाकूर यांनी घेतला राहुल गांधी यांचा समाचार)

दोन्ही बाजूंची वक्तव्ये तपासणार

याबाबत उपउपसभापती गोऱ्हे यांच्याशी संपर्क साधला असता दोन्ही बाजूची वक्तव्ये तपासून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, “सभागृहाचा मान दोन्ही सत्ताधारी-विरोधी पक्ष यांच्याकडून राखला जाणे अपेक्षित आहे. दोन्ही बाजूंची वक्तव्ये तपासून मग निर्णय घेतला जाईल.” (Maharashtra Legislative Council)

‘चारवेळा तडीपार झालेला मी शिवसैनिक’

दानवे यांनी माध्यमांशी बोलताना लाड यांच्यावर तोफ डागली. “मी जे केले त्याचा मला पश्चाताप नाही. माझ्यावर हातवारे करून लाड बोलत होते त्यामुळे माझ्यावर कोणी बोट उचलले तर ते बोट तोंडायची ताकद माझ्या मनगटात आहे. प्रसाद लाड मला हिंदुत्व शिकवणार. अनेक दंगलीच्या केसेस माझ्यावर आहेत. चारवेळा तडीपार झालेला शिवसैनिक आहे मी,” असे दानवे यांनी सांगितले. (Maharashtra Legislative Council)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.