राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एकीकडे राज्यसभा निवडणुकांचे बिगूल वाजले असतानाच आता राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. 20 जून रोजी या निवडणुका घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही राजकीय गणितांची जुळवाजुळव करण्यात येणार आहे.
20 जून रोजी होणार मतदान
या निवडणुकांसाठी 2 जून रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. 9 जूनपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, 20 जून रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ही निवडणूक घेण्यात येणार आहे.
या उमेदवारांची मुदत संपणार
विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, पुतीन जोशी यांच्यासह एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. 22 जुलै रोजी विधान परिषदेच्या या 10 आमदारांची मुदत संपत असल्यामुळे, 20 जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींना येणार वेग
राज्यसभेनंतर अवघ्या 10 दिवसांत राज्य विधीमंडळातील वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग येणार असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community