विधान परिषदेतील 5 सदस्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने तया रिक्त झालेल्या 5 सदस्यांच्या जागी निवडणुकीची (Maharashtra Legislative Election) घोषणा करण्यात आली आहे.
(हेही वाचा Road Accident: राज्यात रस्ते अपघाताची मालिका सुरूच; गेल्या ९ वर्षातील धक्कादायक आकडेवारी आली समोर)
या विधान परिषदेत आमशा पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर या पाच आमदारांपैकी काही जण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत निवडून आले. त्यामुळे या पाच जागांसाठी निवडणूक (Maharashtra Legislative Election) जाहीर करण्यात आली आहे. 10 मार्च 2025 ला नॉटिफिकेशन निघणार आहे.अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 17 मार्च आहे. अर्जाची छाननी 18 मार्चला होणार आहे. 20 मार्च अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे, तर 27 मार्च 2025 या दिवशी मतदान होणार आहे. (Maharashtra Legislative Election)
Join Our WhatsApp Community