एमपी एस सी विद्यार्थी स्वप्नील लोणकर यांनी केलेली आत्महत्या, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण या मुद्द्यावर सरकारं अपयशी ठरत आहे. त्यामुळे याविरोधात पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, ५ जुलै रोजी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र स्वरूपात निदर्शने केली. यावेळी विधानसभेचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे आमदार उपस्थित होते.
सरकारचा निषेध केला!
राज्याचे ५ आणि ६ जुलैला विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व विधेयक आणि अध्यादेशांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळणार आहे. दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच इतर मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. तर याच अधिवेशनात सत्ताधारी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. मात्र त्या आधीच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला.
(हेही वाचा : सेना-भाजप यांचे मार्ग वेगळे, तरी मैत्री कायम! संजय राऊतांचे मत)
मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी!
राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी इंपिरियल डेटा जमा करण्याची गरज आहे, यासाठी सरकार त्याला आता संसदीय कामामध्ये आणून वेळकाढू पण करत माहीत, हे चुकीचे आहे, असेच विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले. त्याचा वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आहे विधानभवनाच्या परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्या वेळी विरोधकांनी घोषणाबाजी केली.
Join Our WhatsApp Community