
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीची शपथ (Maharashtra Legislature Special Session 2024) देण्यासाठी ७,८ आणि ९ डिसेंबर रोजी मुंबईत विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी भाजप आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी आमदारकीच्या शपथ कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला. विरोधी पक्षांचे आमदार विधानभवनातून बाहेर पडले आणि थेट विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जात त्यांना अभिवादन केलं. महाविकास आघाडीतील (Opposition MLA Boycott) पक्षांचे आमदार आज शपथ घेणार नाहीत. भास्कर जाधव आणि जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात भाष्य केलं. (Maharashtra Legislature Special Session 2024)
भास्कर जाधव यांनी याबाबत म्हटलं की, आमचा शपथेला विरोध नाही. आमचा या सरकारला पाशवी बहुमत मिळालं आहे, जवळपास 90 टक्के बहुमत मिळालं आहे, हे देशात यापूर्वी कधी घडलेलं नाही. ही जादू इव्हीएमची आहे. सरकारचा निषेध करुन आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतलाय,असं भास्कर जाधव म्हणाले. या सरकारला पाशवी बहुमत मिळालं हा जनतेचा जनाधार नाही, ती इव्हीएमची किमया आहे. लोकशाही वाचवायची असेल तर लोकशाही मार्गानं निषेध करणं गरजेचं आहे. विद्यमान सरकार ज्यापद्धतीनं सत्तेवर आलं त्याचा निषेध करत आहोत. आज शपथ घेणार नाही पण घेणारचं नाही, असं भास्कर जाधव म्हणाले. (Maharashtra Legislature Special Session 2024)
उद्धव ठाकरे यांच्याकडे मविआची बैठक
दरम्यान, विरोधी महाविकास आघाडीचे घटक पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्री बंगल्यावर जाऊन याबाबत चर्चा करणार आहेत. याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना हे जनतेने निवडून दिलेलं सरकार असतं तर आझाद मैैदानातील शपथविधी सोहळ्यावर अब्जावधी रुपये खर्च केले नसते, असं पटोले म्हणाले. हे सरकार स्वतःचा आनंद स्वतःच व्यक्त करत असल्याचं ते म्हणाले. (Maharashtra Legislature Special Session 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community