Maharashtra Legislature Special Session 2024 : राज्य विधिमंडळाचे ३ दिवसीय विशेष अधिवेशन सुरू; अध्यक्षांची निवड होणार

69
Maharashtra Legislature Special Session 2024 : राज्य विधिमंडळाचे ३ दिवसीय विशेष अधिवेशन सुरू; अध्यक्षांची निवड होणार
Maharashtra Legislature Special Session 2024 : राज्य विधिमंडळाचे ३ दिवसीय विशेष अधिवेशन सुरू; अध्यक्षांची निवड होणार

राज्य विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी, अध्यक्षांची निवड यासाठी आजपासून (७ डिसेंबर) विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाला (Maharashtra Legislature Special Session 2024) सुरुवात होत आहे. यासाठी भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांना हंगामी अध्यक्ष म्हणून शुक्रवारी (६ डिसेंबर) शपथ देण्यात आली. १५व्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनास सुरुवात होत आहे. (Maharashtra Legislature Special Session 2024)

शनिवार व रविवार अशा दोन दिवसांत सर्व २८८ सदस्यांचा शपथविधी पार पडेल. सोमवारी सकाळी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. त्यानंतर राज्यपालांचे नवीन विधानसभेपुढे अभिभाषण होईल. अखेरच्या सत्रात पुरवणी मागण्या, विधेयके सादर केली जातील. (Maharashtra Legislature Special Session 2024)

७८ जणांची पहिल्यांदा शपथ
१५व्या विधानसभेत ७८ सदस्य हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. या नवीन चेहऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे ३३, शिवसेना (एकनाथ शिंदे) १४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ८, शिवसेना (उद्धव ठाकरे) १०, काँग्रेस ६ आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार) चार सदस्यांचा समावेश आहे. त्याशिवाय तीन अपक्ष व किंवा छोट्या पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे. सदस्यांना सभागृहात बोलणे किंवा भाषण करण्यासाठी ही शपथ घ्यावी लागते. (Maharashtra Legislature Special Session 2024)

विधान परिषद सभापतींची निवड होणार ?
विधान परिषदेचे सभापतिपद (Legislative Council Speaker) दोन वर्षे, तीन महिने उलटून अद्याप रिक्त आहे. महायुती सरकारच्या काळात सभापतींची निवडणूक होणार, अशी जोरदार चर्चा होती. परंतु, ती होऊ शकली नाही. सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी विधान परिषदेच्या सभापतींचीही निवडणूक होणार का, याकडे लक्ष असेल. (Maharashtra Legislature Special Session 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.