महाराष्ट्र जीवन (Maharashtra Life) प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या वतीने आझाद मैदानात (Azad Maidan) समितीचे अध्यक्ष अरुण निरभवणे (Arun Nirbhavane) यांच्या नेतृत्वाखाली ” महाराष्ट्र जीवन (Maharashtra Life) प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा ” या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे.
२३ मार्च २०१७ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन (Maharashtra Life) प्राधिकरणातील अधिकारी कर्मचारी यांना राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी असा दर्जा तात्काळ लागू करावा. सातव्या वेतन आयोगाची थकबाकी तात्काळ मंजूर करावी तसेच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित घरभाडे व वाहतूक भत्ता लागू करावा तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाची थकबाकी त्वरित मिळावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र जीवन (Maharashtra Life) प्राधिकरण कर्मचारी सहकारी पतपेढीचे संचालक अभिमन्यू डोळसे त्याचप्रमाणे समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र शिंदे (Rajendra Shinde),सरचिटणीस , साधना भगत आदी मान्यवर उपस्थित होते. (Maharashtra Life)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community