राज्यात अटीतटीचा सामना (Maharashtra Lok Sabha Election Result 2024) आतापर्यंतच्या कलांनुसार पहायला मिळत आहे. राज्यात १९ जागांवर महायुती आणि १३ जागांवर मविआ आघाडीवर आहे. मुंबईतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या कलांकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. (Maharashtra Lok Sabha Election Result 2024) मुंबईतून भाजपचे पियुष गोयल, दक्षिण मध्य मुंबईतून शिंदे गटाचे राहुल शेवाळे (Rahul Shewale), उत्तर पश्चिममधून ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर, दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर आहेत. (Maharashtra Lok Sabha Election Result 2024)
मुंबईतील पहिल्या कलांमध्ये (Maharashtra Lok Sabha Election Result 2024) ठाकरेंच्या शिलेदारांनी मुसंडी मारली आहे. तर नागपुरातून नितीन गडकरी आघाडीवर आहेत. बारामतीत सुप्रिया सुळेंना पिछाडीवर टाकत सुनेत्रा पवारांनी आघाडी घेतली आहे. लोकसभेच्या रिंगणात उतरलेली अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. (Maharashtra Lok Sabha Election Result 2024)
एनडीए १६८ जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी ९३ जागांवर आघाडीवर आहे. (Maharashtra Lok Sabha Election Result 2024) तसेच इतर पक्ष १० जागांवर आघाडीवर आहे. ही आकडेवारी सातत्याने बदलत आहे. तमाम एक्झिट पोल्सनी भाजपाला ३५० ते ३८० जागा मिळतील हा अंदाज वर्तवला आहे. (Maharashtra Lok Sabha Election Result 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community