अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Lok Sabha Election Result 2024) जाहीर होण्यास सुरूवात होत आहे. उत्तर मुंबईतून पियुष गोयल (Piyush Goyal) आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. राहुल शेवाळे हे देखील आघाडीवर आहेत. कल्याणमधुन श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आघाडीवर आहेत. तर, निकालाचा पहिला कल समोर येत आहे. एनडीए 151 आणि इंडिया आघाडी 53 जागांवर आघाडीवर आहे. (Maharashtra Lok Sabha Election Result 2024)
देशात सत्ता कुणाची (Maharashtra Lok Sabha Election Result 2024) याचा फैसला होणार आहे. एकीकडे एनडीएचे नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टर्मसाठी प्रयत्नशील असून दुसरीकडे इंडिया आघाडी मोदींची हॅट्रिक रोखण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मोदींची हॅट्रिक की इंडिया आघाडीची जादू, देशात चलती कुणाची याच्या महानिकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. (Maharashtra Lok Sabha Election Result 2024)
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरूवात झाली आहे. (Maharashtra Lok Sabha Election Result 2024) दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणुकीचे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. एनडीए की इंडिया आघाडी याचा फैसला आज होणार आहे. मतमोजणीला सुरुवात होताच पहिल्या पाच मिनिटांतील पहिले कल हाती आले आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे (Supriya Sule) , तर छ. संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आघाडीवर आहेत. तर नागपुरातून नितीन गडकरी, पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे शिरुरमधून अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. (Maharashtra Lok Sabha Election Result 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community