Maharashtra Lok Sabha Election Result : उबाठाचा मुंबईत भगवा नाही तर ‘हिरवा’ विजय; मनसे नेत्याची ठाकरेंवर सडकून टीका

320
Maharashtra Lok Sabha Election Result : उबाठाचा मुंबईत भगवा नाही तर ‘हिरवा’ विजय; मनसे नेत्याची ठाकरेंवर सडकून टीका
Maharashtra Lok Sabha Election Result : उबाठाचा मुंबईत भगवा नाही तर ‘हिरवा’ विजय; मनसे नेत्याची ठाकरेंवर सडकून टीका

लोकसभा निवडणुकीत (Maharashtra Lok Sabha Election Result ) महाविकास आघाडीला महाराष्ट्रात यश मिळाले असून महाविकास आघाडीच्या ३० जागा निवडून आल्या आहेत. तर विशाल पाटील सांगलीतून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीला केवळ १७ जागा मिळू शकल्या आहेत. मुंबईतही उबाठा गटाने चार पैकी तीन जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने दोन पैकी एका जागेवर विजय मिळविला आहे. उबाठा गटाच्या विजयानंतर आता मनसे नेत्याने ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. (Maharashtra Lok Sabha Election Result )

(हेही वाचा –Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे)

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी एक्सवर पोस्ट टाकत उबाठा गटाच्या विजयावर टीका केली आहे. संदीप देशपांडे एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले, “उबाठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय आहे.” मुंबईत झालेला पराभव हा महायुती आणि मनसेच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. राज ठाकरे यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या, त्या त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला, असा दावा मनसेचे दुसरे नेते गजानन काळे यांनी केला होता. मात्र राज ठाकरे यांनी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरही सभा घेतली होती. पंतप्रधान मोदींसह महायुतीचे अनेक बडे नेते या सभेला उपस्थित होते, तरीही दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाचे नेते अनिल देसाई यांचा विजय झाला आहे. दादरचा भाग याच मतदारसंघात येतो. (Maharashtra Lok Sabha Election Result )

(हेही वाचा –T20 World Cup 2024 : न्यूयॉर्कमध्ये भारतीय संघ करतोय एका पार्कमध्ये सराव)

उत्तर पश्चिम मुंबईचे उबाठा गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचारफेरीत बॉम्बस्फोटातील आरोपाचा सहभाग असल्याचाही आरोप भाजपाने केला होता. उबाठा गटाला नकली शिवसेना म्हणूनही संबोधले गेले. पण मतदारांनी दिलेला कौल आता सर्वांसमोर स्पष्ट आहे. (Maharashtra Lok Sabha Election Result )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.