- सुजित महामुलकर
राजकारणात ‘बॅड पब्लिसिटी’ असा काही प्रकार नसतो, असं म्हटलं जातं. या अलिखित नियमानुसार गेल्या एक-दीड महिन्यापासून म्हणजेच लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होण्याआधीपासून सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली असा एक उमेदवार या निवडणुकीत आहे. त्या उमेदवाराचा प्रचार त्याच्या स्वतःच्या पक्षापासून अन्य सगळेच पक्ष प्रचार करताना दिसत आहेत. कोण आहे ही राजकीय व्यक्ती? (Maharashtra Lok Sabha Elections)
सगळ्या पक्षाचे नेते प्रचारासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) पक्ष प्रमुख शरद पवार, शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत, प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू काँग्रेसच्या यशोमती ठाकूर अशा सर्वच पक्षांच्या नेत्यांनी त्यांची प्रसिद्धी केली आहे. (Maharashtra Lok Sabha Elections)
(हेही वाचा – Reliance Q4 Results : १ लाख कोटींचा नफा नोंदवणारी रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी)
कडू याची ‘तिखट’ टीका
या राजकीय व्यक्ती आहेत भाजपाच्या अमरावती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार नवनीत राणा. नवनीत राणा यांना भाजपाने तिकीट देऊ नये यासाठी बच्चू कडू यांनी खूप प्रयत्न केले. राणा यांच्यावर तिखट शब्दात टीका करत ‘राणा उमेदवार असतील तर त्यांना पाडणार’ अशी घोषणा कडू यांनी केली होती तरी भाजपाने त्यांनाच उमेदवारी दिली. भाजपाची उमेदवारी मिळाल्यानंतरही कडू यांनी ‘पतीचा पक्ष पत्नीने फोडला’ असा प्रहार केला. (Maharashtra Lok Sabha Elections)
मोदींची सभा
राणा यांच्या प्रचारासाठी नुकतीच नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली. या सभेला मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच फडणवीस यांनीही राणा यांना मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले. (Maharashtra Lok Sabha Elections)
राऊतांनी सोडली पातळी
याशिवाय शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच एका सभेत नवनीत राणा यांच्यावर खालच्या शब्दात टीका करत त्यांचा उल्लेख ‘नाची’ असा केला. तसेच ‘त्या डोळा मारतील पण प्रलोभनांना भुलू नका’ या पातळीवर टीका केली. (Maharashtra Lok Sabha Elections)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : नाशिकच्या जागेचा घोळ कायम; दावा सोडला नसल्याची राष्ट्रवादीची माहिती)
‘चुकीला माफी नाही’
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राणा यांना पाठींबा दर्शवला होता आणि त्या निवडून आल्या होत्या. सोमवारी २२ एप्रिलला शरद पवार यांनी राणा यांचे नाव न घेता ‘गेल्या निवडणुकीत आपली चूक झाली’ अशी खोचक टीका केली, मात्र ‘चुकीला माफी नाही’ असे प्रत्युत्तर एका नेटकऱ्याने त्यांना दिले. तर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी ‘ती बया’ असा हीन पातळीवर जाऊन ‘उद्धव ठाकरेंना ती बाया किती बोलली.. एवढं आपल्या बापाला कुणी बोलू शकतं का?’ असे जाहीर वक्तव्य केले. (Maharashtra Lok Sabha Elections)
शेवटचे २-३ दिवस
अशाप्रकारे अगदी निवडणूक जाहीर झाल्यापासून आमरावतीच्या नवनीत राणा प्रसिद्धीच्या झोतात असून अमरावतीला २६ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे पुढील किमान २-३ दिवस तरी राणा यांची प्रसिद्धी सुरू राहणार असल्याचे चित्र दिसते आहे. (Maharashtra Lok Sabha Elections)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community