बापरे…मंत्रालयाचे गेट बनले सुसाईड स्पॉट! शेतकरी, बेकार तरुण आता पोलिस…

राज्याचे मंत्रालयाचे गेट सुसाईट स्पॉट बनले आहे का, असे म्हणावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण गेट समोर कधी शेतकरी, कधी कर्ज बाजारी, कुणी बेकार तर कुणी विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, यात आता पोलिसाची भर पडली आहे.

मंत्रालयाच्या मुख्य गेटवर बंदोबस्तावर असणाऱ्या राज्य राखीव पोलिस दलातील शिपायाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी डोंगरी येथे घडली. जखमी पोलिस शिपायाला सर जे.जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

प्रकृती चिंताजनक

पुष्कर सुधाकर शिंदे (३६) असे जखमी राज्य राखीव पोलिस दलाच्या पोलिस शिपायाचे नाव आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या ग्रुप २ पुणे प्लटून १ मध्ये कार्यरत असलेल्या पुष्कर शिंदे हे ६ जानेवारीपासून मंत्रालय मुख्य गेट वर बंदोबस्तासाठी तैनात होते. सोमवारी रात्रपाळी संपवून सकाळी ९ वाजता शिंदे हे आपल्या प्लाटूनसह डोंगरी येथील मनपा शाळा येथे आले होते. सकाळी ९.५० वाजण्याच्या सुमारास शिंदे यांनी स्वतःजवळील एसएलआर रायफल स्वतःच्या मानेखाली गोळी झाडली. गोळी झाडल्याचा आवाज होताच शिंदे यांचे सहकारी यांनी त्यांना जखमी अवस्थेत जे.जे रुग्णालयात दाखल केले. शिंदे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न का करण्यात आला याबाबत काहीही कारण पुढे आलेले नाही.

(हेही वाचा सेनेकडून टिपूचे पुन्हा उद्दात्तीकरण! प्रजासत्ताकदिनी धर्मांधतेला प्रोत्साहन)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here