मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाला सुरूवात झालेली आहे. २८ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथील हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मारक स्थळावरून मुंबईतील मंत्रालयावर हा लॉंग मार्च मोर्चा काढण्यात आला आहे.
( हेही वाचा : बीएमसीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश)
मंत्रालयावर धडकणार लॉंग मार्च
मोर्चातील गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला असून या मोर्चाला गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. मोर्चाला सुरूवात झाल्यावर मराठा समाजाने ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या.
मराठा समाजाच्या मागण्या
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आम्हाला ओबीसीच्या सर्व शैक्षणिक सवलती देण्यात याव्यात अशी मागणी मराठा समाजाची आहे. परंतु मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती रमेश केरे यांनी दिली. २८ फेब्रुवारीला या मोर्चाला सुरूवात झाली असून राज्यातील महत्त्वाचे सर्वच समन्वयक या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत. हा मोर्चा १ मार्चला मुंबईत धडकणार आहे. यावेळी मराठा आरक्षणासहित प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community