1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे सभा घेऊन राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंग्यांवरुन अल्टीमेटम दिल्यानंतर, आता एमआयएमचे खासदार एम्तियाज जलील यांनी पलटवार केला आहे. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, तर आम्हीसुद्धा औरंगाबादमध्ये त्याच मैदानात सभा घेऊ आणि त्यांच्यापेक्षा जास्त गर्दी जमवून त्याच भाषेत त्यांना उत्तर देऊ, अशी धमकी इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
अशी होती ‘राज’ गर्जना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे सभा घेतली होती. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांवरुन सरकारला अल्टीमेटम दिला. 3 मे ला ईद आहे, त्यामुळे त्यांना त्यांचा उत्सव आनंदात साजरा करु देत, पण 4 मे ला मात्र भोंगे खाली उतरले नाहीत, तर मात्र अजानच्या तिप्पट आवाजात हनुमान चालिसा लावली जाणार, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.
( हेही वाचा: मुंबई विमानतळ 10 मे रोजी राहणार बंद! )
इम्तियाज जलील यांची धमकी
राज ठाकरेंच्या सभेनंतर आता एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी धमकी दिली आहे. जलील म्हणाले, मशिदींवरील भोंगे हा न्यायालयात असलेला विषय आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करावी. तसेच, राज ठाकरे महागाई, बेरोजगारी, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती यांवर बोलू शकत होते, पण त्यांनी फक्त भोंग्यावर बोलणं योग्य समजलं. सरकारने जर राज ठाकरेंवर कारवाई केली नाही, तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही. त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ अशी धमकी इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community