राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेनेकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्याबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले रामलल्ला हा आमच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही अयोध्येत प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. अयोध्या दौऱ्याचा राजकारणाची कोणताही संबंध नाही.
शेकडो शिवसैनिक विमानतळावर केलं भव्य स्वागत
लखनऊ विमानतळावर दाखल होताच त्यांनी अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले, आम्ही नेहमी अयोध्येत येत असतो. त्याप्रमाणे आताही आलो आहोत. यावेळी आदित्य ठाकरेंचं स्वागत कऱण्यासाठी शेकडो शिवसैनिक विमानतळावर दाखल झाले होते. या शिवसैनिकांनी त्यांचं भव्य स्वागत केले. या स्वागतानंतर आदित्य ठाकरेंचा ताफा अयोध्येच्या दिशेने रवाना झाला. तसेच तेथे दाखल झाल्यानंतर ते इस्कॉन मंदिराला भेट देणार आहेत. रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर ते संध्याकाळी शरयू तिरावर आऱती करणार आहे. या दौऱ्यावर असताना ते दुपारी पत्रकार परिषद देखील घेणार आहे. यावेळी ते काय बोलणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचा – #AgnipathScheme: केंद्र सरकारच्या अग्निपथ भरती योजनेला तरूणांकडून का होतोय विरोध?)
आदित्य ठाकरेंचा असा असणार दौरा
- सकाळी 11 वाजता आदित्य ठाकरेंचं लखनऊ विमानतळावर आगमन
- दुपारी 1.30 वाजता- अयोध्येत आगमन. इस्कॉन मंदिराला भेट
- दुपारी 2.30 ते 3.30 वाजण्याच्या दरम्यान हॉटेल पंचशील येथे पत्रकार परिषद
- दुपारी 4.30 वाजता- हनुमान गढी येथे दर्शन घेणार
- संध्याकाळी 5 वाजता- प्रभू श्री रामाचं दर्शन
- संध्याकाळी 6 वाजता- लक्ष्मण किल्ला येथे भेट देणार
- संध्याकाळी 6.45 वाजता- शरयू नदीच्या घाटावर आरती
- संध्याकाळी 7.30 वाजता- लखनऊला प्रस्थान