संपलेल्या विषयावर बोलायचं नसतं, मनसेबाबत आदित्य ठाकरे पुन्हा काय म्हणाले?

129

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभेत महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. त्यानंतर मनसे ही भाजपची सी टीम असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यावरुन मनसेकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी मनसेबाबत प्रतिक्रिया देण्यावर नकार दिला आहे.

मनसेच्या मुद्द्यावर माझं कुठलंही मत नाही. संपलेल्या विषयांवर जास्त काही बोलायचं नसतं. त्यादिवशी मी जी काही प्रतिक्रिया दिली ते राज ठाकरे यांच्या भाषणाबद्दल होतं, पण आता मला त्यावर काहीही बोलायचं नाही, अशी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांनी या विषयावर बोलणं टाळलं आहे.

मनसेची टीका

आदित्य ठाकरेंनी मनसेला भाजपची सी टीम म्हटल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे. ज्या पद्धतीने यांचा भ्रष्टाचार चालू आहे, ज्या पद्धतीने विरप्पन गँग महानगरपालिकेमध्ये सक्रीय आहे, आता हजारो कोटी रुपयांचा हिशोब ईडीला द्यायचा आहे. काय केले, कुठे-कुठे पैसे खाल्ले याचा हिशोब ईडी मागत आहे. त्यामुळे ईडीला हिशोब कसा द्यावा, यावर आदित्य ठाकरेंनी लक्ष द्यावे. आमच्याबद्दल बोलण्याची गरज नाही, आमचे काय ते आम्ही बघून घेऊ. तुमच्यावर जी ईडीला हिशोब द्यायची वेळ आली आहे, ते नीट करा तेवढेच पुष्कळ झाले. असे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटले होते.

(हेही वाचाः आदित्य ठाकरेंच्या टीकेला मनसेचं प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेना तर…)

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

आमचे हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचे आणि सेवा करण्याचे आहे. मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडे काम मिळाले आहे. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.