शिवसेना, भाजप पुन्हा एकत्र येणार? आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

126

2019 मध्ये शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यानंतर या दोन्ही पक्षांच्या नेत्यामध्ये सातत्याने खडाजंगी होत असल्याचे पहायला मिळत आहे. असे सगळे होत असतानाच हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येणार का, अशी चर्चाही काही वेळा कानावर येत असते. याच बाबत आता पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. जर अन्याय होत असेल तर भाजपसोबत मैत्रीचा विषय येतो कुठे, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे हे सध्या कोकण दौ-यावर आहेत. सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. भाजपकडून सातत्याने अन्यायाची वागणूक मिळत आहे. जर आमच्यावर अन्याय करत असाल, तर मैत्रीचा विषय येतो कुठे, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

(हेही वाचाः केंद्रीय अर्थमंत्र्यांचा काॅंग्रेसवर जोरदार हल्ला, म्हणाल्या आमच्या सरकारने…)

भाजपला नैराश्य आलं आहे

राज्यात भाजपने सत्ता गमावल्यामुळे त्यांना नैराश्य आलं आहे. त्यामुळेच सध्या राज्यात भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारविरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात येत आहे. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग हा देशात यशस्वी ठरत आहे. भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढत आहेत, त्यामुळे काही प्रमाणात नाराजी असणं स्वाभाविक असल्याचे देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.