महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर आता मंत्र्यांना कार्यालयीन दालनाचे वाटप करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. खातेवाटपनंतर गेल्याकाही दिवसांपासून दालनाच्या वाटपाची चर्चा जोरदार रंगली होती. अशातच दि. २३ डिसेंबर रोजी कार्यालयीन दालनाच्या वाटपाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Mahayuti)
(हेही वाचा : No-Detention Policy : ५ वी आणि ८ वी मध्ये नापास झालेल्यांना वरच्या वर्गात ढकलता येणार नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय)
यामध्ये भाजपा आमदार तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना मंत्रालय विस्तार इमारतीत पहिल्या मजल्यावरील दालन क्र. १०१, १०१ (अ), १०१ (ब), १०४ ते १०८ या दालनांचे वाटप करण्यात आले आहेत. तर राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रालय विस्तार इमारतीत पाचव्या मजल्यावरील दालन क्र. 504, 506, 508 या दालनांचे वाटप करण्यात आले आहेत. त्याव्यतिरिक्त हसन मुश्रीफ यांना दुसऱ्या मजल्यावर, चंद्रकांत पाटील यांना तिसऱ्या मजल्यावरील दालनाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच दालनाच्यापाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचेही वाटप करण्यात आले. यात चंद्रशेखर बावनकुळेंना (Chandrashekhar Bawankule) रामटेक, राधाकृष्ण विखेंना रॉयलस्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत, गणेश नाईकांना पावनगड बंगला देण्यात आला आहे. (Mahayuti)
कोणत्या मंत्र्यांचे कुठे दालन?