फडणवीस ड्रग्सच्या खेळाचे मास्टरमाईंड! नवाब मलिकांचा थेट आरोप

समीर दाऊद वानखेडे गेल्या 14 वर्षांपासून या शहरात वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत आहेत, त्यांच्या बदलीमागे राज्याचे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असे मलिक म्हणाले.

101

मागील दोन वर्षांपासून ड्रग्सच्या क्षेत्रात बदल होत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ड्रुग्स पेडलर जयदीप राणा यांचा फोटो आहे, नीरज गुंडे याची फडणवीसांच्या बंगल्यावर उठबस होती. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी आणि मुंबईतून बॉलीवूड संपवण्यासाठी समीर वानखेडे यांना फडणवीस यांनी आणले. फडणवीस हेच ड्रग्सच्या खेळाचे मास्टर माईंड आहेत, असा आरोप एनसीपीचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी सोमवारी केला.

फडणवीसांच्या इशाऱ्यावरून सूत्रे हलतात

समीर दाऊद वानखेडे गेल्या 14 वर्षांपासून या शहरात वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत आहेत, त्यांच्या बदलीमागे राज्याचे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आहेत. ड्रग्जचा खेळ मुंबई, गोव्यात सुरु राहावा. मोठ मोठे ड्रग्ज पॅडलर्स मग तो काशिफ खान असो त्याला सोडले जाते, ऋषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभाला सोडले जाते, हे केवळ देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर झाले, असेही मलिक म्हणाले. त्यामुले ड्रग्जच्या खेळाचा मास्टर माईंड राज्याचे माजी मुख्यमंत्री तर नाही ना, हा प्रश्न आमच्या डोक्यात येत आहे.

(हेही वाचा : क्रांती रेडकरला कुटुंबाची सुरक्षा धोक्यात आल्याचे वाटते! काय म्हणणे आहे तिचे?)

अमृता फडणवीस यांचा फोटो केला व्हायरल 

सकाळीच मलिक यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो मलिक ट्वीट केला होता. या फोटोत अमृता फडणवीस यांच्यासोबत दिसणारी व्यक्ती ही ड्रग पेडलर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. ‘या’ ड्रग्ज पेडलरचे भाजपसोबत कनेक्शन काय?’ असा सवाल राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांच्या ट्वीटचा हवाला देत नवाब मलिक यांनी विचारला. ‘चला आज भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांच्या नात्यावर चर्चा करुया’ असेही मलिक म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.