विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणुकीची घोषणा

122

राज्यातील महाराष्ट्र विधान परिषद आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा समावेश आहे. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची देखील निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. या संदर्भात ५ जानेवारी रोजी अधिसूचना निघणार आहे.

पदवीधरचे दोन आणि शिक्षक मतदारसंघाच्या तीन जागांसाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणूकही पार पडणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे रणजीत पाटील आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकण शिक्षकमध्ये बाळाराम पाटील आणि नागपूरचे नागो गाणार हे दोन या अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली आहे. आता या मतदारसंघात कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे.

(हेही वाचा संधी असूनही शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केले नाही; फडणवीसांचा टोला)

भाजपची प्रतिष्ठा पणाला

युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे हे नाशिक पदवीधरचे आमदार होते. त्यांच्या मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्या मतदारसंघात देखील निवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीने दोन वर्षांपूर्वी झालेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यामुळे शिक्षक मतदारसंघात देखील विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तर, अमरावती पदवीधरमध्ये भाजपने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच रणजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे भाजपसाठी देखील या मतदारसंघातील विजय महत्त्वाचा असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.