Maharashtra MLC Election : 11 जागांसाठी मतदान पूर्ण; थोड्याच वेळात होणार मतमोजणी

148
Maharashtra MLC Election : 11 जागांसाठी मतदान पूर्ण; थोड्याच वेळात होणार मतमोजणी
Maharashtra MLC Election : 11 जागांसाठी मतदान पूर्ण; थोड्याच वेळात होणार मतमोजणी

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक झाली. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत झालेल्या मतदानात 274 आमदारांनी आपला मताधिकार बजावला. सायंकाळी 5 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल. त्यानंतर काही तासांतच निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचे 9 व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे 3 असे एकूण 12 उमेदवार मैदानात आहेत. (Maharashtra MLC Election)

(हेही वाचा – Kalyan Dombivli पालिका हद्दीत बेकायदा मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेची कारवाई!)

या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे कोणत्या तरी एका पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होणे निश्चित आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पराभवाची चव चाखावी लागणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

सर्व 274 आमदारांचे मतदान पूर्ण

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान झाले. त्यात विधानसभेतील सर्व 274 आमदारांनी आपला मताधिकार बजावला. या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे कोणत्या तरी एका पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होणे निश्चित आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पराभवाची चव चाखावी लागणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

शिवसेना नेत्यावर गोळीबार केल्याने तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीही मतदान केले आहे. त्यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. त्यानंतरही त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला.

कोण आहेत ते १२ उमेदवार ?

भाजपाचे उमेदवार
पंकजा मुंडे (Pankaja Munde)
परिणय फुके (Parinay Phuke)
अमित बोरखे (Amit Borkhe)
योगेश टिळेकर (Yogesh Tilekar)
सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)

शिवसेना (एकनाथ शिंदे )
भावना गवळी
कृपाल तुमणे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
राजेश विटेकर
शिवाजीराव गर्जे

काँग्रेस
डॉ. प्रज्ञा राजीव सातव

शेतकरी कामगार पक्ष
जयंत पाटील

उबाठा गट
मिलिंद नार्वेकर (Maharashtra MLC Election)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.