दरेकर विधानपरिषदेत भाजपचे गटनेते होणार; प्रसाद लाड यांचे सूतोवाच

131
शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकार उत्तम कामगिरी करत असून, विधानपरिषदेत भाजपची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी प्रवीण दरेकर गटनेते होणार असल्याचे सूतोवाच भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी गुरुवारी सभागृहात बोलताना केले.
लाड म्हणाले, सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांना पाठबळ देणारे आज कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलत आहेत. मग किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात आणि मोहित कंबोज यांच्यावर मातोश्रीबाहेर हल्ला झाला त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मोहित कंबोज यांनी ट्विट केले की ‘कार्यक्रम होतो’

मोहित कंबोज यांनी ट्विट केले की कारवाई होते, असा आक्षेप विरोधी पक्षांनी उपस्थित केला होता. त्यावर बोलताना लाड म्हणाले, मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे. कागदपत्रे हातात असल्याशिवाय ते बोलत नाहीl. त्यामुळे त्यांनी ट्विट केले की कार्यक्रम होतो. ३० तारखेच्या आत सरकार बदलणार असे ट्विट, कंबोज यांनी केले होते, खरे ठरले, याकडे लाड यांनी लक्ष वेधले.

मिठी नदीवर ७५ हजार कोटींहून अधिक खर्च

  •  मागच्या सरकारने कित्येक वाचननामे दिले. पण भ्रष्टाचाराशिवाय दुसरे काहीच केले नाही. ५०० फुटांच्या घरांसाठी मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. बाळासाहेबांच्या नावाने केलेली ही घोषणा आता एकनाथ शिंदे यांनी पूर्ण करावी.
  • २५ वर्षांत मिठी नदीवर ७५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला, पण ती प्रदूषणमुक्त झाली नाही. आयटीआयचा भूखंड उर्दू शाळेला दिला आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी सरकार, असा टोलाही लाड यांनी लगावला.

आम्ही गद्दार असतो तर…; दादा भुसेंनी 

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेत्यांनी शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री दादा भुसे म्हणाले, आम्ही गद्दार असतो तर सचिन अहिर आणि आमशा पाडवी सभागृहात पोहोचले असते का, याचा विचार करा. उलटपक्षी तुमचे संजय जाधव दिल्लीत का पोहोचले नाहीत, याची माहिती घ्या, असे भुसे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.