राष्ट्रवादीच्या सत्ता सहभागानंतर पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले आहे. १७ जुलै ते ४ ऑगस्ट या काळात चाललेले हे अधिवेशन एकदाही तहकूब करण्याची वेळ आली नाही, हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य. यापुढचे हिवाळी अधिवेशन गुरुवार, ७ डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे.
अधिवेशन समाप्तीची घोषणा करताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, पावसाळी अधिवेशनात विधानसभेचे कामकाज एकूण १३ दिवस, प्रत्यक्ष १०९ तास २१ मिनिटे चालले. नियमित बैठकीपैकी २० मिनिटांचा वेळ वाया गेला. दिवसाचे सरासरी कामकाज ८ तास २४ मिनिटे चालले.
(हेही वाचा Gyanvapi : ज्ञानवापी सर्व्हेला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी)
पावसाळी अधिवेशनात १ हजार ८९० लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या. त्यापैकी ५१५ स्वीकृत झाल्या. त्यातील ९८ सूचनांवर चर्चा झाली. शिवाय ६ हजार ६७१ तारांकित सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी ३३१ स्वीकृत, तर ४७ उत्तरित झाल्या.
आमदारांच्या उपस्थितीवर नजर
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांची सर्वाधिक उपस्थिती ९१.४३ टक्के, तर सर्वात कमी उपस्थिती ५५.८६ टक्के इतकी होती. एकूण उपस्थितीचे सरासरी प्रमाण ८२.९० टक्के इतके होते. यापुढचे अधिवेशन नागपुरात गुरुवार, ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
Join Our WhatsApp Community